mp sujay vikhe patil will present position in parliament to bring the law of love jihad sakal
अहिल्यानगर

MP Sujay Vikhe Patil : देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा हवा; डॉ. सुजय विखे पाटील 

खासदार डॉ. विखे म्हणाले, राज्यात लव्ह जिहादचे प्रकार वाढले आहेत. ते थांबले पाहिजेत.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा करणे काळाची गरज आहे. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाली, तर लव्ह जिहाद विरोधी कायद्याविषयी निवेदन करणार आहे, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी सांगितले.

राहुरी येथे आज (शनिवारी) हिंदू सकल समाजातर्फे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चात सहभागी झाल्यावर खासदार ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे म्हणाले, राज्यात लव्ह जिहादचे प्रकार वाढले आहेत. ते थांबले पाहिजेत. अहमदनगर जिल्ह्यात जागरूक नागरिक आहेत. त्यामुळे, असे प्रकार थांबत आहेत. हिंदू समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.

त्यामुळे हिंदू जन आक्रोश मोर्चा निघत आहेत. संविधानात १८ वर्षांवरील सज्ञान तरुण-तरुणींना आंतरधर्मीय विवाहाला मान्यता आहे. परंतु, कायद्यात बदलाची काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हिंदू जनभावनेचा आदर करून लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील, असे ते म्हणाले.

वाहतूक बंद

आक्रोश मोर्चामुळे आज सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नगर-मनमाड मार्गावरील वाहतूक बंद होती. ती वाहतूक बाभळेश्वर व नेवासे मार्गे वळविण्यात आली होती. वाहतूक वळविण्यात आली तरी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

असा होता बंदोबस्त

पोलिस अधीक्षक राकेश ओला, दोन अपर पोलिस अधीक्षक, सहा उपअधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, ४२ उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक, ३८० पोलिस कर्मचारी, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या, शीघ्र कृती दलाची एक कंपनी असे ३०० जवान तैनात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT