MSEDCL's electricity meter was thrown on the road 
अहिल्यानगर

लोकांना वीजमीटर मिळेना.. इथे रस्त्यावर पडलेत..

सकाळ वृत्तसेवा

राहुरी (अहमदनगर) : देवळाली प्रवरा येथे सोसायटी चौकात श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या चहाच्या टपरीमागे महावितरण कंपनीचे तब्बल 25 वीजमीटर उघड्यावर बेवारस अवस्थेत आढळून आले. वीजमीटर शिल्लक नसल्याने, ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, कचऱ्यासारखे फेकलेले मीटर पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर यांनी पंचनामा करून मीटर ताब्यात घेतले.

पंचनामा करून सर्व 25 मीटर ताब्यात

सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांना सोमवारी (ता.1) दुपारी चार वाजता टाकून दिलेल्या वीजमीटरचा ढीग दिसला. खोक्‍यांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेले नवीन वीजमीटर पाहून ढुस यांनी महावितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली. देवळाली प्रवरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता देहरकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून सर्व 25 मीटर ताब्यात घेतले. 

नवीन वीजमीटरचे 25 खोके

"सकाळ'शी बोलताना ढूस म्हणाले, ""नवीन वीजमीटरचे 25 खोके पडलेले होते. खोके उघडून प्लॅस्टिकमधून मीटर बाहेर काढून पाहिले असता, ते नवेच असल्याचे दिसले. सिरियल क्रमांकाचे नवीन मीटर कार्यालयातून कोणी, कधी व कशासाठी ताब्यात घेतले होते, याची चौकशी झाली पाहिजे.'' 

दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी

देवळाली प्रवरा येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता बेवारस पडलेले 25 वीजमीटर पंचनामा करून ताब्यात घेतले. या मीटरचे उत्पादन 2013 चे आहे. सर्व मीटर नादुरुस्त आहेत. मीटर कार्यालयात जमा करणे गरजेचे होते. याबाबत दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून, कारवाई केली जाईल. 
- प्रदीप देहरकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT