२४ स्वच्छतागृहे पाडली SAKAL
अहिल्यानगर

महापालिकेची तब्बल २४ स्वच्छतागृहे पाडली!

मध्यरात्रीच गावगुंडांनी साधला डाव; झारेकर गल्लीतील प्रकाराने शहरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापालिकेच्या मालकीची बांधकामे पाडून टाकण्यात काही लोकांची मजल गेली आहे. सर्वसामन्य वापरत असलेले २४ सार्वजनिक स्वच्छतागृहे कोणीतरी काल मध्यरात्री जमिनदोस्त केली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अहमदनगर शहरामध्ये रात्रीतून काय घडेल, हे सांगता येत नाही, रात्रीस खेळ चाले, या उक्कीतप्रमाणे कालची घटना घडली. झारेकर गल्लीच्या कोपऱ्यावर सार्वजनिक शौचालय आहे. तेथे परिसरातील नागरिकांना स्वच्छतेसाठी चांगली सोय होती. या स्वच्छतागृहाचा वापर परिसरातील नागरिकांबरोबरच शेजारील भाजी बाजारातील लोकही करीत होते. बाहेरून आलेल्या लोकांसाठी ही चांगली सोय होत होती. ही शौचालये पाडल्यामुळे अनेकांची गैरसोय होणार आहे.

अनेक शौचालये गायब

शहरात अनेक शौचालये कागदोपत्री आहेत. काही जागेवर शौचालयेच नाहीत. ती गेली कुठे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे होऊन टपऱ्या उभारल्या आहेत. त्यामुळे अशा शौचालयांच्या जागांवर नेमका कोणाचे अतिक्रमण आहे, याची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

गुन्हा दाखल

शौचालये पाडल्याबाबत महापालिकेचे सुपरवायझर ज्ञानेश्वर शिवाजी झारेकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. झारेकर गल्लीतील रिमांड होमजवळील शौचालयाच्या १८ खोल्यांची मोडतोड करण्यात आली असून, चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यात म्हटले आहे.

चोवीस शौचालये कोणीतरी रात्रीतून पाडली. महापालिकेच्या बांधकामे पाडण्याचे लोकांचे धाडस होतेच कसे, असा प्रश्न आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी होऊन कठोर कारवाई होईल.

- शंकर गोरे, आयुक्त, मनपा

या प्रकाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी. महापालिकेच्या वास्तुंची तोडफोड होत असेल, तर हा प्रकार गंभीर आहे. याबाबत कारवाई करावी.

- सोनाली चितळे, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT