Municipal Corporation should take a decision regarding the corporator post of Balasaheb Borate 
अहिल्यानगर

बाळासाहेब बोराटेंच्या नगरसेवकपदाबाबत तुम्हीच निर्णय घ्या, आयोगाचं महापालिकेला पत्र

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत दिलेले निवेदन राज्य निवडणूक आयोगाने आवश्‍यक त्या कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्‍तांकडे पाठविले आहे, अशी माहिती माजी नगरसेवक संजय घुले यांनी दिली. 

घुले यांनी बोराटे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन 15 जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविले होते. त्यात बोराटे यांनी त्यांच्या मालकीच्या जागेवर अनधिकृत मोबाईल मनोरा उभारल्याचा, महापालिकेचा कर थकविल्याचा व महापालिका निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करून, त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती.

या निवेदनानुसार राज्य निवडणूक आयोगातील कक्ष अधिकारी प्रदीप परब यांनी महापालिका आयुक्‍तांना पत्र देऊन पुढील आवश्‍यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. 

घुले यांनी महापालिका निवडणूक बोराटे यांच्या विरोधात लढविली होती. घुले यांनी निवडणूक प्रक्रियेच्या वेळीच बोराटे यांच्या विरोधात न्यायालयात अर्ज केला होता. याबाबत बोराटे यांना विचारले असता, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT