murder Sakal
अहिल्यानगर

अहमदनगनर : भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला. वाळकी (ता.नगर) गावातील मुख्य चौकात रविवारी (ता.17) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

वाळकी गावामध्ये एकाच गल्लीत राहत असलेल्या लहान मुलांमध्ये सायकली लावण्यावरून सकाळीच किरकोळ वाद झाला होता. लहान मुलांमधील भांडणाचे लोण मोठयांच्या भांडणात पसरले. सकाळी दहा वाजता भांडण सुरू झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करत भांडण मिटविले होते. मात्र, त्यानंतर दुपारी पुन्हा भांडण पेटले. जोरदार हाणामारी सुरू झाल्याने घोळक्‍यात एकटाच सापडलेला जावेद तांबोळी याने आपली जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र, आरोपींनी त्याचा पाठलाग करत येथील सेंट्रल बॅंकेसमोर त्याच्या डोक्‍यात दगड टाकला. यात तो बेशुध्द पडला. त्यांना नगर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मयत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. कायदा व सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, महापौर रितू तावडेंनी झटकले हात; म्हणे, लोक ऐकत नाहीत

Chakan Traffic Crisis : चाकण सोडणार, महाराष्ट्र नाही; त्रस्त उद्योगपतींनी मांडल्या व्यथा, म्हणाले- गुजरातमध्ये जाणार होतो पण...

IND vs SL Test: बुमराह, सुदर्शननंतर भारताला आणखी एक धक्का; मालिका सुरू होण्यापूर्वी एका खेळाडूबाबत नकोशी बातमी समोर...

Marathi News Live Updates : खड्ड्यामुळे उद्योजक त्रस्त, मुख्यमंत्री म्हणाले, चाकणचा विषय गांभीर्याने घेतलाय

Maharashtra Tender Rules: कंत्राटदारांना राज्य सरकारचा चाप, कामगिरी प्रमाणपत्र बंधनकारक; तीन श्रेणींत वर्गीकरण

SCROLL FOR NEXT