Nagar Sakal
अहिल्यानगर

Nagar News : श्रीरामपूरमध्ये आजपासून लिलाव बंद, कांदाप्रश्‍नी शेतकरी आक्रमक

सरकारने निर्णयाचा फेरविचार करून निर्यात शुल्क त्वरित रद्द करावे.

सकाळ डिजिटल टीम

श्रीरामपूर - केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या घातक आहे. यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे.

हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडतील, असा इशारा भारत राष्ट्र समिती व लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्या (ता.२२) पासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीचे घेतल्याचे सभापती सुधीर नवले यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बाजारभाव वाढल्यावर दोन रुपये जास्त मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठविलेला ६०-७० टक्के कांदा सडल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यात केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे.

सरकारने निर्णयाचा फेरविचार करून निर्यात शुल्क त्वरित रद्द करावे. महागाई कमी करायची तर पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी कराव्यात, पण शेतकऱ्यांवर अन्याय करु नये. शेतकरी आंदोलकांच्या भावना विचारात घेऊन उद्या (ता.२२)पासून कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे सभापती नवले यांनी जाहीर केले. त्याला व्यापारी प्रतिनिधी संचालक जितेंद्र गदिया व किशोर कालंगडे यांनीही पाठिंबा जाहीर केला.

यावेळी विरेश गलांडे, मयूर पटारे, काशिनाथ गोराणे, दशरथ पिसे, गणेश छल्लारे, लहानू शेजूळ, महेश पटारे, राजू चक्रनारायण आदींची भाषणे झाली. प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बीआरएसचे कोंडीराम उंडे, हिंमतराव धुमाळ, पुंजाहरी शिंदे, नाना पाटील, भाऊसाहेब हळनोर, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब उंडे, भाऊसाहेब कहांडळ, ज्ञानदेव साळुंके, यशवंत रणनवरे, सोन्याबापू शिंदे, किशोर बनसोडे, बाबासाहेब आदिक, जितेंद्र तोरणे आदी उपस्थित होते.

स्वाभिमानीचीही मागणी

कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याबरोबर केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लिप्टे, जितेंद्र भोसले, सुरेश ताके, भरत आसने यांनीही निवेदनाद्वारे केली आहे.

काँग्रेसचे निवेदन

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा शेतकऱ्यांवर अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्य़ात आले.

यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, सभापती नवले, संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, राजू चक्रनारायण, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, बाबासाहेब दिघे, दिलीप नागरे, रितेश रोटे, वैभव कुर्हे, सनी मंडलिक आदी उपस्थित होते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT