water supply esakal
अहिल्यानगर

Health : दूषित पाणी करतेय आरोग्याची हानी, नळांना गढूळ पाणी; प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक

पावसाळ्यामुळे लहान मुलांना सध्या सर्दी, ताप, खोकला असे आजार होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Health - पावसाळ्यात नवीन पाण्याची आवक होत असते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते फुटलेल्या जलवाहिन्यांत जाते. त्यामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यावर घरगुती उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यामुळे लहान मुलांना सध्या सर्दी, ताप, खोकला असे आजार होत आहेत. विषाणूंपासून ते होतात. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने लवकर बाधते. सर्दी होऊ नये म्हणून लस उपलब्ध आहे.

सध्या वातावरणामध्ये विषाणूंचे प्रमाण जास्त असते. श्वासनलिकेचा आकार लहान असल्यामुळे व प्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे विषाणू श्वासनलिकेत गेल्यानंतर फुफ्फुसावर सूज येते. कफ जमा होतो. उपचाराला उशीर झाला तर न्यूमोनिया होतो.

लहान मुलांमध्ये चिकुनगुन्याचे प्रमाण कमी, तर डेंगीचे प्रमाण जास्त आहे. डेंगी हा आजार एडिस इजिप्ती या डासांमुळे होते. कावीळ हा आजार विषाणूद्वारे होतो. यकृताला विषाणूमुळे होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे कावीळ होते.

मलेरिया हा एनफिलस मॉस्किटो डासांमुळे होणारा आजार आहे. पावसाळ्यामध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डास न होऊ देणे व डास चावू नयेत यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे.

बालदमा लहान मुलांना जितक्या लवकर सुरू होतो, तितक्याच लवकर कमी होतो. बालदमा हा पावसाळ्यातील आर्द्रतेचे प्रमाण, गारवा, दमट हवा, वातावरणातील बदल, धूळ यामुळे होतो. ज्यामुळे बालदम्याचा त्रास होतो, ते टाळणे हे अतिशय गरजेचे असते. बालदम्यासाठी अतिशय आधुनिक उपचारपद्धती आलेली आहे. टायफॉईड हा आजार वयाच्या साधारण एक वर्षापासून होतो.

ही घ्या काळजी

किमान पावसाळ्यात पाणी उकळून घ्यावे

गढूळ पाण्याचा वापर करू नये

मुलांना शिळे पदार्थ, उघड्यावरील पदार्थ देऊ नयेत

बाजारातील तयार पदार्थ टाळावेत.

घरात ओले कपडे ठेवू नयेत

डॉक्टरांनी सुचविलेल्या लस वेळेत घ्याव्यात

नेहमी स्वच्छ ठेवावें घर ।

श्रम करावेत अंगभर ।

हाचि खरा सणवार ।

नित्य सुंदर वर्तणूक ॥

संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये स्वच्छतेचे महत्त्व विशद केले आहे. आपले घर, गाव स्वच्छ ठेवले, तर आरोग्य चांगले राहील, असे त्यांनी त्याद्वारे पटवून दिले आहे.

पावसाळ्यात मुले आजारी पडणे, हे दरवर्षीच होत असले, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या डॉक्टरांकडून वेळेत उपचार घ्यावेत. स्वच्छ पाणी, संतुलित आहार, ताजे अन्न यामुळे बालकांचे प्रकृती व्यवस्थित राहते. प्रत्येकाने याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेत लस घेतल्यास आजारापासून होणारे धोके टळतात. त्यामुळे लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नये.

- डॉ. दिलीप बागल, बालरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT