Rohit Pawar Sakal
अहिल्यानगर

Nagar : ‘‘त्या’ जमीन खरेदीची चौकशी व्हावी’; आमदार रोहित पवारांची मागणी...

'त्या' जमिनींची खरेदी 'ते' आमदार असताना २०११ मध्येच झाल्याचा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केला

सकाळ वृत्तसेवा

कर्जत - कर्जत-जामखेड मतदारसंघात नीरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला होता.

त्याला उत्तर देताना या जमिनींची खरेदी ते आमदार असताना २०११ मध्येच झाल्याचा पलटवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आज आमदार शिंदे यांनी विधानपरिषदेत या विषयावर चर्चा करताना मतदारसंघात नीरव मोदी यांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप केला.

त्यावर आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला. नीरव मोदी आणि त्यांच्याशी संबंधित फायरस्टोन ट्रेडिंग कंपनी प्रा. लि. यांनी २०११ मध्येच संबंधित जमीन खरेदी केल्याचे सांगितले.

दरम्यान, आमदार रोहित पवार हे अनेक दिवसांपासून कर्जत-जामखेड मतदारसंघात औद्योगिक वसाहतीच्या मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी याला तत्त्वतः मंजुरी मिळवली.

त्यानंतर जागेची पाहणी, ड्रोन सर्व्हे, वन विभागाचा सर्व्हे आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. हा विषय विधानभवनात गाजला.

अधिसूचना निघाली तर आतापर्यंत एखादा मोठा प्रकल्पही या ठिकाणी सुरू झाला असता आणि त्याचे श्रेय मला मिळेल म्हणून राम शिंदे हे सरकारवर दबाव आणून या विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT