prajakt tanpure 
अहिल्यानगर

नागरदेवळे, केकतीत होणार नगरपालिका; मंत्री तनपुरेंची माहिती

दत्ता इंगळे

नगर तालुका ः नगर तालुक्यातील शहरालगत असलेल्या व नगरपालिकेच्या निकषात बसणाऱ्या नागरदेवळे, वडारवाडी, केकती-शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळून लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. आता ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे धोरण ही बदलण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

नगर तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधताना तनपुरे म्हणाले, नगर शहरालगतचा भाग असूनही नागरदेवळे, वडारवाडी, केकती-शहापूर या भागांचा विकास झाला नाही. ग्रामपंचायत असल्याने येथे विकासात्मक योजना सुरू करण्यात मर्यादा येत होत्या. या तीनही ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यातच राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल. शासनस्तरावरून माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे.’’

तनपुरे म्हणाले, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सातत्याने अडचणीत येत आहेत. त्यामुळे या योजनांचे धोरणात बदल करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या आहेत. याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पिंपळगाव माळवी व परिसरातील सात-आठ गावांतील पाणी योजना आता सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत. या योजना आता महावितरणला जोडणार असून त्यासाठी ६० लाखांचा खर्च येणार आहे. त्यामुळे योजना स्वयंपूर्ण होतील. ग्रामपंचायतींना आर्थिक उत्पन्न ही मिळू शकेल.

जिल्हयात १o वीज उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात डोंगरगणचा समावेश आहे. नगर तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात विखुरला आहे . त्यांना जात प्रमाणपत्रे , घरकुले , शिधापत्रिका आदि व्यक्तिगत लाभाच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

नगर जिल्ह्यात बहुतांशी सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी नगरपालिकांची निर्मिती करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. आता महाविकास आघाडी सरकारनेही नगरपालिका निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नागरदेवळे हे मंत्री तनपुरे यांच्या मतदारसंघात येते. त्यामुळे त्यांनी या नगरपालिकेसाठी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Crime News : घराच्या अंगणातच गाडले आई-वडिल अन् बहिणीचे प्रेत अन्... भयानक हत्याकांडापुढे 'दृश्यम' ची कहाणी देखील फेल !

मिचेल मार्शने केली पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद; India vs Pakistan लढतीवरील बहिष्कारावर विचारलेला प्रश्न अन्... Video

Latest Marathi News Live Update: भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड

Acidity Foods: सुरकुत्यांमुळे त्रस्त आहात? आजच आहारातील 'या' 3 पदार्थांना म्हणा टाटा-बाय-बाय!

SCROLL FOR NEXT