Nagar Police inspector Dhananjay Jadhav valuable advice girls Said should trusted Sakal
अहिल्यानगर

Nagar : पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचा मुलींना 'मोलाचा' सल्ला; म्हणाले...

सोशल मीडियाद्वारे विद्यार्थिनींची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - शालेय विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे. कुठे काही आक्षेपार्ह घडल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. मुलींनी अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले.

उंबरे येथे मुलींची छेडछाड झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पालकांनी मुलींना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची गंभीर दखल घेऊन जाधव यांनी उंबरे व ब्राह्मणी येथील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

जाधव म्हणाले की, मुलींनी कुणालाही न घाबरता नियमित शाळेत यावे. कोणी त्रास देत असल्यास तत्काळ आपल्या शिक्षकांना किंवा मला त्याची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. त्यासाठी माझा मोबाईल क्रमांक सर्वांसाठी देत आहे.

सोशल मीडियाद्वारे विद्यार्थिनींची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यापासून दूर राहावे. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नये.

शाळेत एक तक्रारपेटी ठेवावी. मुलींना शाळेत येताना व जाताना टारगट मुले त्रास देत असतील, तर त्याची माहिती या पेटीत टाकावी. अशा टारगट मुलांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही जाधव यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT