Crime Sakal
अहिल्यानगर

मोबाईलने घेतला बळी; अरणगावातील त्या खुनाचे रहस्य अखेर उलगडले

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : शहराजवळील बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव शिवारात उड्डाणपुलाजवळ ता.26 ऑगस्ट रोजी अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला होता. मयत व्यक्‍तीच्या वर्णनाची माहिती शेजारील पोलिस ठाण्यांना दिली होती.

त्यानंतर मयताची ओळख स्पष्ट झाली. त्यानंतर मृताची ओळख स्पष्ट झाली. विकास महादेव कदम (वय 40, हल्ली रा. वैष्णवीनगर, केडगाव, मूळ रा. सातारा) या व्यक्‍तीचा खून झाल्याचे निष्पन झाले होते. दरम्यान या अरणगाव (ता.नगर) येथे झालेल्या खुनाचे रहस्य उलगडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी या गुन्ह्याचा तपास केला. विकास कदम हा काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्यात आली. त्यामध्ये ता. 25 ऑगस्ट रोजी विकासचे एका सहकाऱ्यासमवेत मोबाईलवरून वाद झाले होते. विकासने मोबाईल चार्जिंगला लावला होता. तो कोणीतरी लपवून ठेवला होता. विकास आणि त्याचा सहकारी चालक व मित्र मिनीनाथ मच्छिंद्र अडसुरे (रा. कायनेटिक चौक, सध्या रा. अरणगाव, ता. नगर) हे दोघे ता. 25 रोजी रात्री एकत्र दारू पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी मोबाईल लपविल्यावरून दोघांमध्ये वाद झाले. मिनीनाथ याने या वादातून विकासला काठीने मारहाण केली. विकासचा या मारहाणीत मृत्यू झाला. आरोपी मिनीनाथ याला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT