amc van 
अहिल्यानगर

'थ्री स्टार' मिळवून देण्याचे श्रेय नगरकरांचे 

सकाळ वृत्तसेवा

नगर : "केंद्र सरकारच्या "स्वच्छ भारत' अभियानात काही वर्षांपूर्वी नगरचा क्रमांक खालून शेवटी लागत होता. मात्र, सर्व नगरकरांच्या योगदानामुळे या "स्वच्छ भारत' अभियानात कचराकुंडीमुक्‍त शहर म्हणून नगर देशात गणले गेले. नगरला "थ्री स्टार' मिळवून देण्याचे श्रेय नगरकरांचे आहे,'' असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 


महापालिकेच्या सेवेत आज नवीन 65 कचरागाड्या दाखल झाल्या. आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. 
महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, आरिफ शेख, विजय गव्हाळे, उपायुक्‍त दिनेश सिनारे आदी उपस्थित होते. 


संग्राम जगताप म्हणाले, "या योगदानामध्ये महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासन, नागरिक, महापालिका कर्मचारी व नगरकरांनी एकजुटीने काम केल्यामुळे आज आपल्या नगर शहराला "थ्री स्टार' मानांकन मिळाले. नगरचे नाव देशात अव्वल ठरले,'' असे जगताप म्हणाले. 


महापौर वाकळे म्हणाले, "जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही चांगले काम केले. पूर्वी नगर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. कचऱ्याचा ठेका दिल्यावर शहरातील सर्व कचरा उचलला गेला. शहर कचराकुंडीमुक्‍त झाले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT