shara pawar and nagawade
shara pawar and nagawade  sakal media
अहमदनगर

नागवडे दाम्पत्याची विधानसभेची तयारी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : ज्येष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळा लोकार्पण कार्यक्रमासाठी रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नागवडे कारखान्यावर येत आहेत. ज्या काँग्रेस पक्षासाठी बापूंनी हयातभर संघर्ष केला, त्यांचे सहकारातील काम पाहून राज्य साखर संघावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी देणारे पवार येणार असल्याने, त्यांच्यासमोर बापूप्रेमींचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. यात आगामी विधानसभेची व्यूहरचना दडल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने तयारीही सुरू आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांची, प्रामाणिक आणि परखड नेता अशी ख्याती राज्यभर राहिली. अनेक संधी असतानाही त्यांनी पक्षाला कधीच सोडचिठ्ठी दिली नाही. पक्षासाठी अनेक वेळा त्याग केला. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतदादा पाटील व ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी बापूंना कायम ताकद दिली. तालुक्यासह जिल्हाभर बापूंना मानणारे, तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. परखड आणि खरे बोलणारा नेता, अशी त्यांची ओळख शेवटपर्यंत राहिली.

येत्या रविवारी बापूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला महत्त्व आहे. त्यातच महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढण्याची मानसिकता केल्याने, हा कार्यक्रम नागवडे गटाचे बळ दाखविणारा ठरणार आहे. त्यामुळे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी गावोगावी बैठका घेत कार्यक्रमाला येण्याचे आवाहन कार्यकर्ते, शेतकऱ्यांना केले आहे.

दोन्ही काँग्रेसची सहमती एक्स्प्रेस

तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काही काळापासून एकत्र काम करीत आहेत. काही निवडणुकांत बेबनाव झालाही असेल, मात्र एकंदरीत हे दोन्ही पक्ष एकत्रित असल्याचे दिसते. मात्र, आता विधानसभेसाठी सगळेच तयारीला लागले आहेत. कोणत्या पक्षाला नि कोणत्या नेत्याला अधिकृत उमेदवारी मिळणार, याकडे श्रीगोंदे तालुक्यातील राजकीय वर्तुळासह जनतेचे लक्ष लागले आहे.

राहुल जगताप यांनीही दाखवले बळ

माजी आमदार राहुल जगताप यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचे शक्तिप्रदर्शन केले आहे. राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही, मात्र ते सर्वाधिक लोकसंपर्क असणारे सध्याचे नेते बनले आहेत. त्यात आता नागवडे यांच्या कार्यक्रमाला पवार येणार असल्याने शक्तिप्रदर्शनाची वेळ त्यांची आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अर्थात, पवार व बापू असे समीकरण कार्यक्रमाचे असल्याने, लोकांचे दोन्ही नेत्यांवरचे प्रेम गर्दी खेचणार असले, तरी कुठे कमतरता राहू नये याची दक्षता घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT