Narendra Modi and balasaheb thorat 
अहिल्यानगर

Narendra Modi : उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान; थोरातांचा हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर - राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद असून नवी दिल्ली येथे बांधलेल्या नवीन सेंट्रल व्हिस्टा या संसद इमारतीचे उद्घाटनासाठी राष्ट्रपतींना अधिकार न देणे हा राज्यघटनेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. या पदावर महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदीजी मुर्म या आदिवासी समाजातील आहेत. उद्घाटनाचा अधिकार हा राष्ट्रपती महोदयांचाच आहे. मात्र असे होताना दिसत नाही हे संपूर्ण देशाला वाईट वाटणारे आहे.

आदिवासी , मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना संधी न देणे हा राज्यघटनेचा अपमान आहे. समृद्ध लोकशाही असलेल्या या देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन केले पाहिजे. ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त भावना आहे. मात्र असे होताना दिसत नाही याचे संपूर्ण देशाला वाईट वाटत असल्याचे ही काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT