Nashik-Pune highway street lights battle of political credulity sangamner
Nashik-Pune highway street lights battle of political credulity sangamner Sakal
अहमदनगर

Ahmednagar News : पथदिव्यांमुळे हायवे पुन्हा ‘हॅपी’; राजकीय श्रेयवादाच्या लढाईत संगमनेरकरांची करमणूक

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : राजकीय वादात अडकलेल्या नाशिक-पुणे महामार्गावरील पथदिव्यांचे कवित्व पंधरा दिवसानंतरही संपायला तयार नाही. भाजपाचे आंदोलन व काँग्रेसच्या पूर्वनियोजित धुमधडाक्यात हजारो संगमनेरकरांच्या साक्षीने लोकार्पण केलेले पथदिवे दुसऱ्या दिवसापासून बंद झाले. मध्यंतरीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप व श्रेयवादाच्या लढाईनंतर बुधवारी (ता.११) सायंकाळी हा महामार्ग पूर्ण क्षमतेने प्रकाशित झाला.

शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नाशिक-पुणे राज्यमार्ग ( क्र.७१अ ) च्या दुभाजकांवरील पथदिव्यांचा मंगळवारी (ता.२६) लोकार्पण समारंभ वादाच्या भोवऱ्यात अडकला. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी नियोजित कार्यक्रमापूर्वी दुपारी महाविद्यालयीन मुलींच्या हस्ते पथदिव्यांचे उद्घाटन उरकून घेत आनंद साजरा केला.

यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी एरवी शाब्दीक चकमकीवर निभावणारा वादाचा मुद्दा धक्काबुक्कीपर्यंत पोचला. त्यानंतर आमच्या उद्घाटनाच्यावेळी पथदिवे जाणीवपूर्वक बंद ठेवल्याचा आरोप केला. यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात सुमारे अडीच तास बसस्थानक परिसरात केलेला रास्तारोको काही वेळासाठी पथदिवे प्रकाशमान झाल्याच्या आनंदोत्सवाने साजरा झाला.

सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप

बुधवारी सायंकाळी कोसळत्या पावसात हजारो अबालवृध्द, स्त्री पुरुषांनी मालपाणी उद्योग समूहाने प्रायोजित केलेल्या आयर्न गाला डीजे व इमॅजिका शोचा मनमुराद आनंद घेत लखलखणाऱ्या पथदिव्यांचा लोकार्पण सोहळा अनुभवला.

यानंतर दुसऱ्या दिवसांपासून पथदिवे पुन्हा बंद झाल्याने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. तेंव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे काम आमचेच असल्याचा दावा करीत सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाचा गदारोळ उडवला. या श्रेयवादाच्या लढाईत संगमनेरकरांची मात्र चांगलीच करमणूक झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT