Nathabhau explained the working method of Dilip Gandhi and Anil Rathore 
अहिल्यानगर

नाथाभाऊंनी सांगितली दिलीप गांधी, अनिल राठोड यांच्या कामाची पद्धत

सकाळ वृत्तसेवा

नगर ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे माजी मंत्री (स्व.) दिलीप गांधी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शिवसेना कार्यालयात भेट देऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (स्व.) अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

(स्व.) गांधी यांचे दिल्लीत कोरोनामुळे निधन झाले. खडसे यांनी गांधी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. गांधी यांनी आयुष्यभर भाजपचे काम निष्ठेने केले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला. नगरच्या विकासासाठी त्यांचा कायम आग्रह असे. कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे व ते काम पूर्ण करणे, हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. त्यांचे काम नेहमीच स्मरणात राहिल, अशा शब्दांत त्यांनी गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी तसेच कुटुंबिय उपस्थित होते. 

खडसे यांनी नगरमधील शिवसेना कार्यालयास भेट देऊन राठोड यांचा यांना श्रद्धांजली अर्पण केली. राठोड यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, गणेश कवडे आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT