The NCP made bread on the streets 
अहिल्यानगर

सरकारमुळे संसार उघड्यावर, राष्ट्रवादीने थापल्या रस्त्यावर भाकरी

संजय आ. काटे

श्रीगोंदे : सर्वच आघाड्यांवर भाववाढ झाल्याने सर्व सामान्यांना दररोजचे जगणेही मुश्कील झाले आहे. पोटापाण्याचीही त्यांना भ्रांत झाल्याने संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गॅस व इंधन दरवाढ केल्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयापुढेच चुलीवर भाकरी थापत अनोखे आंदोलन केले.

तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. 
महिला तालुकाध्यक्ष मीनल भिंताडे म्हणाल्या, की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी असतानाही, केंद्र सरकार वारंवार गॅस व इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे.

कोरोनामुळे आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला. अशा परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. केंद्र सरकार रोजच गॅस व इंधन दरवाढ करीत आहे.

तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, मनीषा शेलार, सीमा गोरे, कल्याणी लोखंडे, शोभा शिर्के, विद्या आनंदकर, निर्मला डफळ, आशा शेलार, गीता गायकवाड, मृणाली शेलार, मुकुंद सोनटक्के, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT