Sharad Pawar eSakal
अहिल्यानगर

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

Latest Political News: अतुल लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथे खासदार पवार यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

नीलेश मोरे : सकाळ वृत्तसेवा

latest Maharashtra news: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे श्रीगोंदे येथील शिष्टमंडळ पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची उद्या (ता.२१) सकाळी बारामती येथे भेट घेणार आहे. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याने ही भेट महत्त्वाचीची मानली जाते.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात श्रीगोंदेची जागा राष्ट्रवादीकडेच राहण्याची शक्यता अधिक मानली जाते. राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार राहुल जगताप हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार समजले जातात. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राहुल जगताप व बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे येथे खासदार पवार यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती.

या भेटीत जगताप यांना कामाला लागण्याबाबत पवारांनी ''ग्रीन सिग्नल'' दिल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष देखील श्रीगोंदेची जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व खासदार शरद पवार यांच्यातील भेट महत्त्वाची मानली जाते. माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, विवेक पवार आदींचे शिष्टमंडळ खासदार पवार यांची भेट घेणार आहे.

पवार यांच्या मेसेजकडे लक्ष

या भेटीत खासदार पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदेच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांना काय ''मेसेज'' देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यावर आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या भेटीकडे लक्ष राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs GT Live : शुभमन गिलचे शतक थोड्यात हुकले, पण साई सुदर्शनसह राजस्थानला चांगलेच झोडले! गुजरात टायटन्सचा धावांचा डोंगर

Pune Highway Protest: दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जाईल," - आमदार रोहित पवार

RR vs GT Live : वन अँड ओन्ली शुभमन गिल! IPL मध्ये नोंदवला विराट, रोहितलाही न जमलेला विक्रम... सुदर्शनसह मिळून आणखी एक पराक्रम

LPL Rules: क्रिकेटमधील धक्कादायक नियम! फॉलोअर्सनुसार खेळाडूंची लीगमध्ये निवड होणार; नव्या नियमाने चाहत्यांमध्ये संताप

School Safety: नवीन तमलूर जि.प. शाळेची इमारत धोक्यात; पावसाळ्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने स्थलांतराची ग्रामस्थांची मागणी

SCROLL FOR NEXT