NCPs Manisha Jadhav was elected unopposed as the chairperson of the Panchayat Samiti.jpg 
अहिल्यानगर

पंचायत समितीच्या सभापती पदी मनीषा जाधव यांची निवड

सकाळ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : येथील पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसभापती हेमंत मोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, अश्विनी कांनगुडे, साधना कदम, प्रशांत बुद्धिवंत, श्याम कांनगुडे, नितीन धांडे, सुदाम धांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मावळत्या सभापती अश्विनी कांनगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर या निवडीसाठी पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.  सभापती पदासाठी मनीषा जाधव यांच्या एकमेव अर्ज आल्यावर त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत गुलालाची उधळण केली.निवडीनंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे हस्ते श्रीमती जाधव यांचा  सत्कार करण्यात आला. 

या वेळी राजेंद्र फाळके म्हणाले, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समितीची विकास आणि प्रगतीची घोडदौड सुरू राहील.

मनीषा जाधव म्हणाल्या, आमदार रोहित पवार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे माझ्या सहकारी अश्विनी कांनगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे माझ्या सारख्या सर्वसामान्य गृहिणीला आमदार पवार, राजेंद्र फाळके आणि पती दिलीप जाधव यांच्या मुळेच सभापती पदी काम करण्याची संधी मिळाली. तिचे सोने करीत पंचायत समिती राज्यात अववल करू. या वेळी नितीन धांडे यांनी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल जाधव यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT