MLA Kapil Patil esakal
अहिल्यानगर

शिक्षकांमधील विषमता दूर करण्याची गरज : आमदार कपिल पाटील

सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : काही शिक्षकांना मोठा पगार तर काहींना तुटपुंजा पगार अशी शिक्षकांमधील विषमता दूर करण्यासाठी शिक्षक भारती पाठपुरावा करीत आहे. विनाअनुदानित हा शब्द कायमचा रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांना नियमीत पगार सुरू झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारतीने लढा पुकारला आहे. प्रश्‍नांची सोडवणूक होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दिली.

तरुणांच्या रोजगारासाठी योजनाबद्ध कार्यक्रम

आमदार पाटील म्हणाले की, कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. तरुणांच्या नोकऱ्यांचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाचे दर भरमसाठ वाढले आहेत. महागाईच्या प्रश्‍नावरून लक्ष विचलित करण्यासाठी जाती-धर्माचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पुढील काळात तरुणांच्या रोजगारासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नगर जिल्हा शिक्षक बॅंकेची निवडणूक शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी लढवावी. परंतु, त्यासाठी स्वतंत्र मंडळ तयार करावे, असेही त्यांनी सूचविले.

विधान परिषद सदस्यत्वाची पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार पाटील यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्काप्राप्त शिक्षकांचा सत्कार राज्य प्राथमिक शिक्षक भारती सभासद यांच्या सहकार्यातून करण्यात आला. राष्ट्रसेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुनराव कोकाटे अध्यक्षस्थानी होते.

जिल्ह्यात बालभवन केंद्र

नगर जिल्हा हा राष्ट्रसेवा दल व सत्यशोधक चळवळींचा बालेकिल्ला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांवर देशभक्तीचे संस्कार रुजवावेत, यासाठी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक भरतीचे राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांच्या कल्पनेतून साने गुरुजी बालभवन केंद्र सुरु करण्यात आले आहे.

खोटा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना विरोध करा

पुस्तके बदलून खोटा इतिहास सर्वांसमोर मांडण्याचे कारस्थान देशात सुरू आहे. त्यामुळे शाळांमध्ये आता शिक्षकांनाही खोटा इतिहास शिकविण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे असा खोटा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांना जोरदार विरोध करा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, जिल्हा सरचिटणीस सुनील मते, महिला अध्यक्षा उषाताई येणारे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राज्य सरचिटणीस भरत शेलार, उपाध्यक्ष किशोर कदम, विनोद कडव, पप्पू मुलानी, शिवाजीराव खुडे, सुर्यभान काळे, प्रकाश दाने, स्वाती बेडभर, मंगेश भांगरे, चांगदेव काकडे, हिराताई गाडे, शोभा वाणी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT