Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra Tourists Stranded in Nepal Flood : नेपाळमधील पूर आणि भूस्खलनामुळे महाराष्ट्रातील सात पर्यटक अडकले आहेत. चौघांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित आहेत. उर्वरित तिघांशी संपर्क साधण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
7 Maharashtra tourists stranded in Nepal

7 Maharashtra tourists stranded in Nepal

esakal

Updated on

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील सात पर्यटक अडकले आहेत. त्यापैकी मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी दोन अशा चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात राज्य सरकारला यश आले असून, हे चारही पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com