nevasa city bandh today on shankarrao gadakh issue ahmednagar sakal
अहिल्यानगर

मंत्री गडाखांच्या पाठी नेवासा

‘बंद’सह निषेध सभा; ‘आरोपींना अटक करा’

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व युवा नेते उदयन गडाख यांना जिवे मारण्याचा कट सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे उघड झाल्याने, तसेच राहुल राजळेंवर झालेला गोळीबाराच्या निषेधार्थ आज नेवासे तालुक्यातील व्यापाऱ्यांसह विविध संघटनांनी कडकडीत ‘बंद’ पाळला. दरम्यान, गडाख समर्थकांसह विविध पक्ष व संघटनांच्या वतीने संबंधित गुन्हेगारांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी बुधवारी (ता. २७) नेवासे शहरातून तब्बल चार हजार गडाख समर्थकांनी निषेध मोर्चा काढला. दरम्यान, तालुक्यातील शंभराहून अधिक गावांत निषेध सभा झाल्या.

नेवासे पंचायत समिती आवारातून निषेध मोर्चास दुपारी बाराच्या सुमारास प्रारंभ झाला. श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौक, नाथबाबा चौकामार्गे मोर्चा तहसील कार्यालय परिसरात आला. या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना ‘मुळा’चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, युवानेते इम्रान दारूवाले, बाळासाहेब कोकणे, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, सभापती रावसाहेब कांगणे यांनी निवेदन दिले.

यावेळी उपसभापती किशोर जोजार, काशिनाथ नवले, सरपंच सतीश निपुंगे, शहरप्रमुख नितीन जगताप, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष नीरज नांगरे, नारायण लोखंडे, मनोज वाघ, राजू काळे, सोपान औटी, भाऊसाहेब वाघ आदींसह हजारो आंदोलक सहभागी झाले होते. दिवसभर गडाख पिता-पुत्रांवरील व्हायरल क्लिपची नेवासे तालुक्यात चर्चा सुरू होती.

ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाखांचे शिष्टमंडळ

मोर्चानंतर काही वेळाने ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख व ज्येष्ठ नेते तुकाराम नवले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, तसेच तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांची भेट घेत कायदा- सुव्यवस्थेबाबत चर्चा केली.

मंत्री गडाखांनी व्यक्त केले ऋण!

मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, की फेसबुकच्या माध्यमातून माझ्यासह उदयन यांना जिवे मारण्याच्या कटाच्या निषेधार्थ नेवासे तालुका व्यापारी असोसिएशन व विविध संघटनांनी नेवासे तालुका उत्स्फूर्त ‘बंद’ ठेवला. गडाख कुटुंबीयांवर असलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. ‘तालुका बंद’मुळे सर्वसामान्य जनतेची अडचण होऊ नये म्हणून ‘बंद’ मागे घेऊन सर्व दुकाने सुरू करावीत, अशीही विनंती केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT