New varieties of soybeans of the Agricultural University yielding double 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ः डबल उत्पादन देणारे सोयाबीन वाण आले

रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे विकसित केलेले केडीएस-992 हे सोयाबीन पिकाचे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आले आहे. दक्षिण भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा व आंध्रप्रदेश या पाच राज्यांत या वाणाच्या लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

केंद्रीय सोयाबीन वाण ओळख व प्रसार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सोयाबीनचा केडीएस-992 हा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण ठरला. सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख यांनी हा वाण विकसित केला आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. टी. आर. शर्मा तर सोयाबीन अनुसंधान संस्था, इंदोरच्या संचालक डॉ. नीता खांडेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाणाची निवड करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख आणि अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिलीप कटमाळे, सोयाबीन पैदासकार डॉ. मिलिंद देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
 

पारंपारिक वाणापेक्षा उत्पादकता दहा टक्‍क्‍यांनी अधिक असल्यास तो वाण प्रसारणासाठी पात्र ठरतो. पारंपरिक सोयाबीन वाण हे एकरी 5 ते 8 क्विंटल उत्पादन देतात, या वाणाची सरासरी उत्पादकता सहा क्विंटलने अधिक आहे. हा वाण शेतकऱ्यांना एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन देऊ शकतो. या शिवाय हा वाण दक्षिण भारतात पाने खाणाऱ्या अळीसाठी काही प्रमाणात सहनशील असून तांबेरा रोगास कसबे डिग्रज येथे मध्यम प्रतिकारक्षम ठरला आहे. याचे दाणे मोठ्या आकाराचे असून 100 ते 105 दिवसात हा वाण पक्व होतो.

- डॉ. मिलिंद देशमुख, सोयाबीन वाण पैदासकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Sandeep Naik: तिकीट न मिळाल्याने नाराज, पक्ष बदलला; पराभवानंतर संदीप नाईकांचे राजकीय पुनरागमन! राजकारणात खळबळ

Eggs Cause Cancer: अंडी खाल्ल्याने कर्करोग होतो का? FSSAI ने उघड केली वस्तुस्थिती, महत्त्वाची माहिती समोर

Latest Marathi News Live Update : पोलिसांकडून तीन दिवसांत २०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT