Nighoj Gram Panchayat members abducted from Pune 
अहिल्यानगर

निघोज ग्रामपंचायत सदस्यांचे पुण्यातून अपहरण, आज होईल फैसला

अनिल चौधरी

निघोज : सरपंचांची निवड अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, सहलीवर गेलेल्या निघोज येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना घडली आहे.

रविवारी सहलीवर गेलेले हे सदस्य लघुशंकेसाठी खेड (जि. पुणे) परिसरात थांबले, तेव्हा अज्ञात आठ ते दहा जणांनी या सदस्यांचे अपहरण केले. अपहरण झाले, की सदस्य स्वत:विरोधी गटात सामील झाले, याबाबत पारनेर तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी काल "बंद' पाळत निषेध व्यक्त केला. 

निघोज ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. संदीप वराळ पॅनलला आठ, सत्ताधारी ग्रामविकास पॅनलला चार व महाविकास आघाडीला दोन, तर वाडी-वस्ती मंडळाला तीन जागा मिळाल्या. सोडतीत निघोज ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर होताच महाविकास आघाडीच्या सुधामती कवाद यांनी पदावर दावा ठोकून, माजी सरपंच ठकाराम लंके यांच्या पुढाकारातून समविचारी नऊ सदस्यांना सहलीवर नेले.

कोल्हापूर येथून देवदर्शन उरकून येताना खेडमधील रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या दिगंबर भागाजी लाळगे व गणेश दत्तू कवाद या दोन सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात दहा ते बारा जणांनी वाहनात बसवून पोबारा केला.

या वेळी सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या सुधामती कवाद यांचे पती विठ्ठल कवाद यांना मारहाण करण्यात आली. पॅनलप्रमुख ठकाराम लंके यांनी खेड पोलिसांना माहिती दिली. खेड पोलिस ठाण्यात सचिन वराळ यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अपहरण झाले, की स्वतःच गेले? 
निघोजच्या सरपंचपदाची निवड आज आहे. या सदस्यांचे अचानक अपहरण करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. सहलीवर गेलेल्या काही सदस्यांच्या "लोकेशन'वरूनच त्यांचा ठावठिकाणा लागल्याचे बोलले जाते. त्यामुळे या सदस्यांचे अपहरण झाले, की नाराज होऊन हे सदस्य गेले, याबाबत पारनेर तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Accident: राहुल गांधींच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात! पाच वाहने आणि रुग्णवाहिकेची धडक

''नशीब समजा रामने अल्पसंख्यांकाना नाही मारलं'', मतदार यादीतल्या चुकांवर युपी निवडणूक आयोगाचं अजब उत्तर

Gold Rate Today: दिवाळीआधी सोन्याचे भाव धडाम! ऑक्टोबरमध्ये 7,000 तर उच्चांकापासून 38,000 रुपयांनी स्वस्त; मुंबई-पुण्यात भाव किती?

Maharashtra Live News : देऊळगाव राजा मधील दोन बड्या मसाला व्यावसायिकांवर एफडीएची धडक कारवाई, एक कोटींचा माल जप्त

Kolhapur Rickshaw Drivers RTO Report : 'सायेब, कुठं जाणार? चला की सोडतो...'; कोल्हापूरच्या रिक्षाचालकांचे मराठी खणखणीत; परीक्षेची गरजच नसल्याचा पाठविला अहवाल

SCROLL FOR NEXT