Nilesh Dnyandev Lanke hunger strike of Tanpure Factory Rescue Action Committee sakal
अहिल्यानगर

Nilesh Lanke : आमदार लंकेंचा पुन्हा एकदा जिल्हा बँकेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा

नीलेश लंके : तनपुरे कारखाना बचाव कृती समितीच्या उपोषणास दिला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : तनपुरे साखर कारखाना सुरू व्हावा, मागील सहा वर्षांतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी कारखाना बचाव कृती समितीतर्फे सुरू असलेल्या उपोषणास केवळ पाठिंबा नाही, तर मी तुमच्याबरोबर आहे. वेळप्रसंगी जिल्हा बँकेसमोर मंडप टाकून उपोषणाला बसेन, असे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

राहुरी येथे तहसील कार्यालयासमोर आज (शुक्रवारी) उपोषणस्थळी भेटीप्रसंगी आमदार लंके बोलत होते. चक्रीउपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता. कारखाना बचाव कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ, राजू शेटे, पंढरीनाथ पवार, बाळासाहेब जठार, दादासाहेब पवार यांनी आमदार लंके यांच्यासमोर कारखान्यातील गैरव्यवहाराचा पाढा वाचला. तहसीलदार फसियोद्दीन शेख पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे उपस्थित होते.

लंके म्हणाले, की डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा राज्यात नावलौकिक होता. कारखाना पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत होत्या. मी पण सहलीच्या निमित्ताने कारखाना बघितला आहे. आज कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारखान्यात किती भ्रष्टाचार झाला. हे मला आत्ता समजले.

कारखाना सुरू होण्यासाठी मी स्वतः तुमच्याबरोबर असणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी‌ संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविली जाईल. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली आहे. वेळप्रसंगी तुमच्याबरोबर उपोषणाला बसण्याची तयारी आहे.

- नीलेश लंके, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT