nilesh lanke statement i am with ncp sharad pawar maharashtra politics ajit pawar esakal
अहिल्यानगर

NCP Crisis : पवारसाहेबच माझे दैवत, दोन दिवसांत सगळे ठीक होईल - नीलेश लंके

मी शपथविधीच्या वेळी उपस्थित होतो हे खरे असले, तरीही माझे पवारसाहेब, तसेच दादा व ताई या तिघांशीही नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते.

मार्तंड बुचुडे

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून, एक कुटुंब आहे. मी त्या कुटुंबातील एक छोटा सदस्य आहे. शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे योग्य तो निर्णय येत्या दोन दिवसांत घेतील. पुन्हा सर्व काही ठीक होईल.

पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होईल, अशी परमेश्वराजवळ माझी प्रार्थना आहे. तिघांचेही माझ्यावर खूप उपकार असून, पवार साहेब माझे दैवत आहेत. त्यांनी मला राजकारणाची दिशा, दादांनी ताकद, तर ताईंनी माझे हट्ट पुरविले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

काल राजकारणात घडलेल्या घडामोडी या धक्कादायक आहेत. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी राजकारणात अनुभवी नाही. मात्र, आमच्या पक्षात फूट पडली असे वाटत नाही.

कारण, हा पक्ष नसून एक परिवार आहे. त्यामुळे पक्षात फूट पडणार नाही, अशी मला खात्री आहे. मी शपथविधीच्या वेळी उपस्थित होतो हे खरे असले, तरीही माझे पवारसाहेब, तसेच दादा व ताई या तिघांशीही नेहमीप्रमाणे बोलणे झाले होते. आमचे कुटुंबप्रमुख पवारसाहेब सक्षम आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. हे तिघेही माझे राजकीय गुरू आहेत.

लंके म्हणाले, की आमचा पक्ष हा एक परिवार आहे. मी या परिवाराबरोबर राहणार आहे. आमचा पक्ष हे एक कुटुंब आहे. जर मला तुम्ही विचारले, की तुम्हाला आई पाहिजे की वडील, तर मला दोघेही सारखेच आहेत. त्यांची वाटणी कशी करणार? तसे मला आमचे दैवत पवारसाहेब दादा व ताई हे तिघेही सारखेच आहेत, असेही ते म्हणाले.

लंके यांच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पारनेर येथे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात उद्या आमदार लंके काय बोलणार, तसेच ते आपली भूमिका जाहीर करणार का, याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

‘त्यांच्या’मुळेच घडलो

माझ्या आयुष्यात जे पाहावयास मिळाले नव्हते, ते मला पवारसाहेबांमुळे पाहावयास व अनुभवायला मिळाले. त्यांनी मला काय दिले नाही? स्वतःबरोबर जेवू घातले, माझ्या खांद्यावर हात ठेवला, हातात हात घेतला. हे कधीच विसरू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT