No corona kit was found in Rahuri for investigation 
अहिल्यानगर

राहुरीत तपासणीसाठी कोरोना किटच मिळेनात

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शासनाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये कोरोनाची तपासणी थंडावली आहे. मागील तीन दिवसापासून रोज तीस किट उपलब्ध होत असल्याने, गरजूंना नगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी जावे लागत आहे. कोरोना तपासणी होत नसल्याने, गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड सुरू झाली आहे. 

राहुरी कृषी विद्यापीठ येथील कोवीड केअर सेंटरमध्ये रोज दीडशे ते दोनशे जणांच्या रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या केल्या जात होत्या. ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्याने, आठ दिवसांपासून घशातील स्वॅब घेऊन, तपासणी केली जात होती. परंतु, मागील तीन दिवसांपासून रोज फक्त तीस जणांची स्वॅब तपासणी केली जात आहे.

खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले पंधरा ते वीस जण रोज तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीसाठी पुन्हा खासगी प्रयोगशाळेत मोठा खर्च करावा लागत आहे. 

विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण खासगी दवाखान्यात जातात. त्यांना थंडी, ताप, खोकला असल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिक कोरोनाची तपासणी करण्यास सांगत आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाची मोफत तपासणी सेवा थंडावल्याने, रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. 

कोरोना तपासणी वाढविण्यासाठी रोज शंभर किटची मागणी केली आहे. ॲन्टीजेन चाचण्यांच्या किट संपल्या आहेत. नगर येथे जिल्हा रुग्णालयात कोरोना किटचा तुटवडा आहे.

- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

SCROLL FOR NEXT