Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

Ladki Bahin Yojana ₹5,000 Crore Claim : योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध असतानाही १६ लाख अपात्र व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही?
Ladki Bahin Yojana on Supriya Sule

Ladki Bahin Yojana on Supriya Sule

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Latest Update : माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेल्या माहितीनुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील कथित गैरव्यवस्थापनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर प्रश्न उपस्थित केलेत. अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचा दावा करत सरकारने या प्रकरणावर स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून केलीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com