remdesivir e-sakal
अहिल्यानगर

रेमडेसिव्हिरप्रकरणी वडाळा ग्रामपंचायतीची कोविड सेंटरला नोटीस

खुलास न केल्यास गुन्हा दाखल करणार

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीने रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणानंतर गावातील कोविड सेंटरला परवानगीच्या नावाखाली नोटीस (notice) बजावली आहे. दोन दिवसांत खुलासा करा, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. (Notice of Wadala Gram Panchayat to Covid Center in Remedisivhir case)

नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी (ता.९) वडाळा बहिरोबा येथील एका हाॅटेलसमोर छापा टाकून रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी रामहरी घोडेचोर (देवसडे ता.नेवासे), सागर हंडे (खरवंडी ता.नेवासे), आनंद थोटे (भातकुडगाव ता.शेवगाव), पंकज खरड (देवटाकळी ता.शेवगाव) या चार आरोपीस सहा रेमडेसिव्हीर इंजेक्शनसह अटक केली होती.

या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तो या कोविड सेंटरचा संबंधित असल्याने वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतीने शनिवारी (ता.१५) रोजी मासिक बैठकीत ठराव क्रमांक ६ नुसार मराठी मिशन संस्थेच्या एफ.जे.एफ.एम रुग्णालय संचलित कोविड सेंटरला नोटीस बजावली आहे. विनापरवानगी सेंटर सुरू करणे, वैद्यकीय कच-याची व्यवस्थित विल्हेवाट न लावता कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यासह अन्य बाबी नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांत खुलासा करा, अन्यथा साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. गुन्हे अन्वेषण पथकाने वडाळा बहिरोबा येथे कारवाई केल्यानंतर संबंधित रुग्णालयाजवळील औषधाचे दुकान रात्रीतून बंद करण्यात आल्याने संशय वाढला आहे. रेमडेसिव्हीर काळाबाजारप्रकरणी फरार आरोपी कोविड सेंटरशी संबंधित असल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सूर आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.(Notice of Wadala Gram Panchayat to Covid Center in Remedisivhir case)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: गोरेगाव स्टेशन परिसरात अनधिकृत भाजीवाल्यांचा वाढता दादागिरीचा कहर

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT