Now you will get sorghum and maize on the ration card 
अहिल्यानगर

आता शिधापत्रिकेवर मिळणार ज्वारी आणि मकाही

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्याच्या धान्यामध्ये मका आणि ज्वारीही दिली जाणार आहे. आठ तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना मका, तर दोन तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना गव्हाबरोबरच ज्वारीही दिली जाणार आहे. नगर शहरासह चार तालुक्‍यांतील शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. 

अंत्योदय योजनेत प्रतिकार्ड 25 किलो धान्य आणि 10 किलो तांदूळ दिला जात आहे. अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि नगर शहर हद्दीतील लाभार्थीना प्रतिकार्ड 25 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ दिला जाणार आहे. कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नगर तालुका, पाथर्डी तालुक्‍यातील लाभार्थींना 5 किलो गहू आणि 20 किलो मका दिली जाणार आहे. शेवगाव आणि नेवासे तालुक्‍यांतील लाभार्थींना सात किलो गहू आणि 18 किलो ज्वारी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 10 किलो तांदळात कोणतीही घट झालेली नाही. 

प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांसाठी धान्य दिले जाते. अकोले, संगमनेर, राहुरी, पारनेर आणि नगर शहरातील प्रतिव्यक्‍ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. 

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदे, जामखेड, नगर तालुका, तसेच पाथर्डी तालुक्‍यातील लाभार्थींना प्रत्येक व्यक्‍तीसाठी एक किलो गहू आणि दोन किलो मका दिली जाणार आहे. शेवगाव आणि नेवासे तालुक्‍यांतील व्यक्‍तींना प्रत्येकी एक किलो गहू आणि दोन किलो ज्वारी दिली जाणार आहे. तांदळाच्या नियतामध्ये कोणताही बदल केलेला नाही. प्रत्येक व्यक्‍तीला दोन किलो तांदूळ दिला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT