The number of corona in the city is 23 in the afternoon 
अहिल्यानगर

नगरमध्ये कोरोनाचा दुपारी २३चा आकडा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगरमध्ये दिवसांतून एकदाच कोरोनाबाधितांचे रिपोर्ट यायचे. परंतु खासगी लॅबमध्ये तपासणी सुरू झाल्यानंतर त्यांचे अहवाल दिवसातून किमान तीनवेळा येत आहेत. प्रत्येक वेळी किमान २० ते २५ रूग्ण वाढत आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील १५, श्रीगोंदा येथील ०७ आणि पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ३१५ इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६४९ इतकी झाली आहे.

आज बाधित आढळलेल्या रुग्णामध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील ०१, श्रीगोंदा येथील झेंडा चौक येथील ०५ तसेच श्रीगोंदा शहरातील एक आणि तालुक्यातील वडळी येथील एक जण बाधित आढळून आले.

नगर शहरात गवळी वाडा येथील ०९, चितळे रोड ०१, झेंडी गेट ०१, आणि शहराच्या मध्यवस्तीत ०४ जण बाधित आढळून आले आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली.

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

Hockey World Cup: दोनदा आघाडी, पण तरी अखेर चीनविरुद्ध भारताची बरोबरी! पहिल्याच सामन्यात रंगला थरार

Aadhaar Centres Only on Paper: मुळशीतील आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर; २० पैकी ७ केंद्रे मंजूर ठिकाणीच नाहीत, काहींचा ठाव ठिकाणा प्रशासनालाच नाही

Marathi News Live Updates : रायगडमध्ये पावसाळी पर्यटनाला गेलेला तरुण काळ नदीत बेपत्ता

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

SCROLL FOR NEXT