The number of corona patients is around fifty thousand 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितांचा आकडा पन्नास हजाराकडे

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 820 कोरोनाबाधित आढळून आल्याने, बाधितांची संख्या 49 हजार पार झाली. तसेच, आज 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 89.20 होती. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 43 हजार 858 झाली आहे. आतापर्यंत 759 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयात 5550 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात एकूण 820 रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 49 हजार 167 झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 130 बाधित आढळले. त्यांत महापालिका हद्दीतील 26, अकोले 18, जामखेड सहा, कर्जत दोन, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण नऊ, नेवासे पाच, पारनेर सात, पाथर्डी 14, राहाता चार, संगमनेर तीन, श्रीगोंदे 11, श्रीरामपूर तीन, मिलिटरी हॉस्पिटल 16, अन्य जिल्ह्यांतील चार रुग्णांचा समावेश आहे. 
खासगी प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात 361 बाधित आढळून आले. त्यांत महापालिका हद्दीत 55, अकोले 35, जामखेड सहा, कर्जत दोन, कोपरगाव नऊ, नगर ग्रामीण 17, नेवासे 12, पारनेर सहा, पाथर्डी सात, राहाता 35, राहुरी 22, संगमनेर 136, शेवगाव पाच, श्रीगोंदे तीन, श्रीरामपूर 10, तसेच कॅंटोन्मेंटमधील एकाचा समावेश आहे. 

अँटिजेन चाचणीत 329 बाधित आढळले. त्यांत महापालिका हद्दीतील 43, अकोले 13, जामखेड 25, कर्जत 25, कोपरगाव सात, नगर ग्रामीण तीन, नेवासे 19, पारनेर 14, पाथर्डी 38, राहाता 21, राहुरी 37, संगमनेर 26, शेवगाव 22, श्रीगोंदे 16, श्रीरामपूर 15, कॅंटोन्मेंटमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून 361 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांत महापालिका हद्दीतील 60, अकोले 11, जामखेड 27, कर्जत 23, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण 46, नेवासे पाच, पारनेर 10, पाथर्डी 22, राहाता 26, राहुरी 43, संगमनेर 35, शेवगाव 22, श्रीगोंदे 12, श्रीरामपूर एक, कॅंटोन्मेंट तीन, मिलिटरी हॉस्पिटलमधील 13 रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Chhatrapati Sambhajinagar: वाहनधारकांची पेट्रोल पंपांवर झुंबड; ‘नो स्टॉक’चे बोर्ड; शेतीकामे, विवाह सोहळ्यांसह वाहतुकीला मोठा फटका

Maharashtra Weather Update : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT