corona 
अहिल्यानगर

कोरोनाने केले पुन्हा कोपरगाव टार्गेट... 

मनोज जोशी

कोपरगाव (नगर) : तालुक्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आज 58 संशयित नागरिकांच्या तपासण्यामध्ये तब्बल 15 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यात 58 जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत एकाच घरातील तीन रुग्ण आढळले आहे. शहरातील स्वामी समर्थनगर येथे तब्बल 10 रुग्ण आढळले असून त्यात सहा पुरुष, चार महिलांचा समावेश आहे. शिंदे-शिंगी नगर येथील एक 14 वर्षीय मुलगी बाधित आढळली आहे. कोपरगाव बेट येथील 21 वर्षीय तरुण व डाऊच खुर्द येथे एक कोरोना बाधित आढळला आहे. एकाच दिवसात 15 रुग्ण वाढल्याची हि पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिकांत या साथीची भीती वाढली आहे.

काल सायंकाळी आठ पेशंटचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. लक्ष्मीनगर येथील दोन पुरुष, सुरेगाव येथील 27 वर्षीय पुरुष, शिंदे-शिंगीनगर येथील 49 वर्षीय पुरुष व एक 36 वर्षीय महिला या खेरीज स्वामी समर्थनगर येथील 54 वर्षीय महिला व 21 वर्षीय पुरुष व एक 66 वर्षीय महिला आदी 8 नागरिकांचा समावेश होता. आता आज 15 रुग्णांची भर पडल्याने दोन दिवसात २३ रुग्णांची भर पडली आहे. एकंदरीत कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक मात्र म्हणावे इतके या आजाराबाबत गंभीर दिसत नाही. महसूल, पोलीस नगरपालिका प्रशासन लक्ष ठेऊन आहेत.  मात्र नागरिकांनी साथ देणे आवश्यक आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT