The number of corona patients is increasing dramatically
The number of corona patients is increasing dramatically 
अहमदनगर

सावधान! कोरोना धोक्याची पातळी ओलांडतोय

सकाळ डिजिटल टीम

नगर : कोरोना गेला आता लस आली तरी घ्यायची नाही, अशीच मानसिकता लोकांची बनली होती. परंतु कोरोनाने हळूहळू डोके वर काढले. पन्नासवर आलेला आकडा वाढीला लागला आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.

पूर्वीप्रमाणे लोकांच्या भीती राहिलेली नाही. ही बाब चांगली असली तरी विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. बाजारात लस आल्याने बेफीरपणा वाढला आहे. परंतु अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. यासाठी प्रशासन लोकांना उपाय योजना करायला सांगते आहे. लग्नातील, समारंभातील गर्दी टाळण्याच्या सूचना देत आहे. तरीही कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. काल (शुक्रवारी) दिवसभरात जिल्ह्यात 303 कोरोनाबाधित आढळून आले. वाढती रुग्णसंख्या पाहून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात होते. 

जिल्ह्यात आजअखेर 77 हजार 110 कोरोबाधित आढळून आले आहेत. त्यांतील 74 हजार 564 जणांनी कोरोनावर मात केली. आजअखेर एक हजार 152 जणांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयात एक हजार 394 जणांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 186 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही टक्केवारी 96.70 इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 174, खासगी प्रयोगशाळेतील तपासणीत 118 व अँटिजेन चाचणीत 11 जण बाधित आढळून आले. नगर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 84, खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 23, असे शहरातील एकूण 107 जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्‍यात दिवसभरात 13 जण बाधित आढळून आले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT