The number of corona patients in private hospitals decreased 
अहिल्यानगर

खासगी हॉस्पिटलमधील कोरोना रूग्णसंख्या रोडावली

अमित आवारी

नगर ः जिल्हा प्रशासनाकडून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जागृती झाली. दुसरीकडे, प्रशासनाने तालुक्‍याच्या ठिकाणीही कोरोना केअर सेंटर सुरू केल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेण्यास येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. 

एकूणच, जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असल्याने, शहरातील खासगी रुग्णालयांनी कोरोनाव्यतिरिक्‍त अन्य आजारांवरही तपासणी व उपचार सुरू केले आहेत. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू झाले. कोरोनाच्या भीतीने अन्य आजारांचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती होणे टाळत होते. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे.

आता जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण निम्म्याने कमी झाले आहे. यातच जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहे. कोणतीही लक्षणे नसलेले कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. अतिसंवेदनशील रुग्णच केवळ कोरोना रुग्णांसाठीच्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत. त्यामुळे खासगी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

खासगी रुग्णालयांनी कोविड सेंटरमधील बेडची संख्या कमी केली असून, आता अन्य आजारांवर उपचार सुरू केले आहेत. शिवाय, बाह्यरुग्ण विभाग, सीटी स्कॅन, एक्‍स-रे, रक्‍ततपासणी, प्रसूतिगृह, बालरुग्ण विभाग आदी सुविधा पुन्हा सुरू केल्या जात आहेत. 

  • जिल्ह्याची लोकसंख्या ः सुमारे 45 लाख 
  • जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेले कोरोनाबाधित ः 45 हजार 25 
  • बरे झालेले रुग्ण ः 40 हजार 317 
  • मृत्यू ः 726 
  • उपचार घेत असलेले रुग्ण ः 3 हजार 982 
  • क्‍वोट 

कोरोनाव्यतिरिक्‍तही जग आहे. कोरोनापेक्षाही अन्य आजारांनी मृत पावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर उपचार होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अन्य आजारांवरील उपचार सुरू केले आहेत. 
- डॉ. एस. एस. दीपक, संचालक, साईदीप हॉस्पिटल 


कोरोनाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. यात लक्षणे नसलेले रुग्ण घरीच उपचार घेतात. कमी लक्षणे असलेले कोविड सेंटरमध्ये उपचार घेतात. कोविडचा त्रास होत असलेल्या रुग्णांची संख्या केवळ 20 टक्‍के आहे. तेच हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये आता अन्य आजारांसाठी निम्मे बेड उपलब्ध आहेत. आगामी दोन महिन्यांत जनजीवन सुरळीत होईल. 
- डॉ. राकेश गांधी, संचालक, सुरभी हॉस्पिटल 


नोबल हॉस्पिटलमध्ये सुरवातीपासून निम्मे बेड कोविडसाठी राखीव होते. अन्य आजारांवरही उपचार सुरू होते. "नोबल'मध्ये येणाऱ्या कोविडच्या रुग्णसंख्येत फारसा बदल झालेला नाही. मात्र, जिल्हाभरात लोकांमध्ये कोविडबाबत जागृती झाल्याने रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसते. 
- डॉ. राहुल हिरे, प्रशासकीय अधिकारी, एशियन नोबल हॉस्पिटल 

कोरोनाबाधितांची संख्या सध्या कमी झालेली असून, जिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध आहेत. बाधितांची संख्या कमी होत चालली असली, तरी प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करणे गरजेचे आहे. 
-बापूसाहेब गाढे, नोडल अधिकारी, जिल्हा रुग्णालय. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

Latur Accident: चाकूरमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सरखाली येऊन नगरपंचायती कर्मचारी ठार

South Africa vs New Zealand: दक्षिण आफ्रिकन संघाची विजयी सलामी; न्यूझीलंडवर सात विकेट राखून मात; मोकोएना ठरला सामनावीर

Kolhapur Scam : गॅस कनेक्शन बंद होण्याच्या; नावाखाली फसवणुकीचा धोका, पुणे - मुंबईतील सायबर गुन्हेगार झाले सक्रिय

Latest Marathi Update : दुबईतील ड्रोन हल्ल्यांनतर एमिरेट्सचे विमान तिरुवनंतपुरमला माघारी परतले

SCROLL FOR NEXT