The number of corona victims increased in Shrirampur 
अहिल्यानगर

सावध ऐका पुढल्या हाका.. श्रीरामपुरात कोरोना पाय पसरतोय

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : कोरोनाबाधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह, तर सहा जणांचे निगेटिव्ह आले. अद्याप 20 अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच, काल रात्री प्रभाग क्रमांक दोनमधून एका संशयिताला तपासणीसाठी नगरला हलविले आहे. शहरासह तालुक्‍यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 19वर पोचला आहे. 

सर्दी- खोकल्याचा त्रास होत असल्याने संबंधित अधिकारी तपासणीसाठी शनिवारी (ता. 27) नगरला गेले होते. काल दुपारी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रशासनाने त्यांच्या थेट संपर्कातील 13 जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले. त्यांतील 11 जणांचे अहवाल आले असून, त्यात अधिकाऱ्याच्या कुटुंबातील चौघे व एका सहकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. 

मोलकरणीने लावला जिवाला घोर 

प्रशासनाने अधिकाऱ्याच्या कुटुंबातील मोलकरणीसह तिच्या दोन मुलांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले आहेत. ही मोलकरीण शहरातील एका खासगी रुग्णालयासह विविध ठिकाणी काम करीत असल्याचे सांगितले जाते. 

लोकप्रतिनिधींसह 13 जण होम क्वारंटाईन

तसेच, संबंधित अधिकाऱ्याने मागील आठवड्यात सहकाऱ्यासह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह बैठकीतील 13 जणांना प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. 

20 अहवाल बाकी 

दरम्यान, खैरी निमगाव येथील कोरोनाबाधित तरुणीच्या थेट संपर्कातील वधू-वरासह 13 जण व प्रभाग दोनमधील 70 वर्षीय बाधित महिलेच्या संपर्कातील तीन, मातुलठाण येथील तरुणासह एकूण 20 जणांचे तपासणी अहवाल बाकी आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : “चुकीच्या मार्गाने १०० रुपये कमवाल, तर जागा तुरुंगातच!” पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना कडक इशारा

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT