The number of Corona victims moved up to five hundred 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितांचा आकडा सरकला पाचशेच्या पुढे

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. काल दिवसभरात 509 रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 

कोरोना लसीकरण सुरू झाल्याने नागरिक निश्‍चिंत झाले. कोरोनाबाबतचे नियम पायदळी तुडविले जात असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. बऱ्याच दिवसांनंतर आज दिवसभरात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने पाचशेचा आकडा पार केला. त्यामुळे आता 2015 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज 327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 76 हजार 343 झाली.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत 195, खासगी प्रयोगशाळेत 253, तर अँटिजेन चाचणीत 61 जण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात नगर शहरातील 79, अकोले 9, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 8, नेवासे 8, पारनेर 7, पाथर्डी 1, राहाता 1, राहुरी 1, संगमनेर 14, शेवगाव 29, श्रीगोंदे 12, श्रीरामपूर 1 आणि अन्य जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालात नगर शहरातील 59, अकोले 7, जामखेड 9, कर्जत 2, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 10, नेवासे 10, पारनेर 6, राहाता 52, राहुरी 10, संगमनेर 29, शेवगाव 12, श्रीगोंदे 2, श्रीरामपूर 16, तसेच अन्य जिल्ह्यांतील सहा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत नगर शहरातील 10, कर्जत 2, नगर ग्रामीण 1, पारनेर 2, पाथर्डी 1, राहाता 5, राहुरी 29, शेवगाव 1, श्रीगोंदे 1, श्रीरामपूर 4 आणि अन्य जिल्ह्यांतील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

एकूण कोरोनाबाधित : 79 हजार 528 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 76 हजार 343 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 2015 
मृत्यू : 1170 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT