The number of coronary victims has gone up to 52,000 
अहिल्यानगर

कोरोनाबाधितांचा आकडा गेला ५२ हजारांवर पण रोजची संख्या घटतेय

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 316 बाधित आढळले. आजअखेर जिल्ह्यात 52 हजार 136 कोरोनारुग्णांची संख्या झाली. त्यातील 796 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील 434 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 48 हजार 688 झाली आहे. सध्या रुग्णालयात 2652 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 93.99 झाली. 

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात 41 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत नऊ, कर्जत एक, कोपरगाव दोन, नगर ग्रामीण सात, पारनेर दोन, पाथर्डी एक, राहाता पाच, राहुरी दोन, संगमनेर पाच, शेवगाव एक, श्रीगोंदे दोन, श्रीरामपूर तीन, कॅन्टोन्मेंटमध्ये एक रुग्ण आढळून आला. 

खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 91 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 24, अकोले 22, जामखेड दोन, कोपरगाव एक, नगर ग्रामीण सहा, नेवासे तीन, पाथर्डी आठ, पाथर्डी दहा, राहुरी एक, संगमनेर एक, श्रीगोंदे नऊ, मिलिटरी हॉस्पिटलमधील चौघांचा समावेश आहे. 
अँटीजेन चाचणीत 184 बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीत 12, अकोले नऊ, जामखेड 16, कर्जत दहा, कोपरगाव दहा, नगर ग्रामीण सात, नेवासे 16, पारनेर चार, पाथर्डी 35, राहाता 20, राहुरी सात, संगमनेर 13, शेवगाव 12, श्रीगोंदे पाच, श्रीरामपूर आठ रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील 434 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यात महापालिका हद्दीतील 81, अकोले 30, जामखेड 29, कर्जत 25, कोपरगाव नऊ, नगर ग्रामीण सहा, नेवासे 23, पारनेर 15, पाथर्डी 44, राहाता 24, राहुरी 38, संगमनेर 28, शेवगाव 30, श्रीगोंदे 24, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट आठ व मिलिटरी हॉस्पिटलमधील पाच रुग्णांचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT