malnutrition sakal
अहिल्यानगर

अकोले तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली

२०२१ मध्ये सर्वाधिक बालके कुपोषित; अंगणवाडी सेविकांचे प्रयत्न

शांताराम काळे

अकोले - अकोले तालुक्यात गेल्या वर्षात अचानक कुपोषित बालकांची संख्या वाढली होती. तालुक्यातील ही संख्या हजाराच्या पुढे गेली होती. मात्र, यंदा ही संख्या घटली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश मिळविले. तालुक्यातील गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक कुपोषित बालके २०२१ या वर्षातील आहेत. एक हजारपेक्षा बालके जास्त तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित या वर्षात निघाली.

अकोले तालुक्यात बालकांसाठी अकोले व राजूर असे दोन विभाग आहेत. दोन्ही विभागांत कुपोषित बालकांचा आकडा २०२१ मध्ये हजाराच्या वर गेला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांना अन्न शिजवून देण्याचे काम बंद करण्यात आले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी जिवाची पर्वा न करता बालकांसाठीच्या डाळी, पूरक अन्न, अंडी, केळी पालकांच्या ताब्यात दिले. काही सामाजिक संघटनांनी या बालकांना पोषणआहार दिला. मात्र, कुपोषणग्रस्तांचा आकडा कमी होण्याऐवजी वाढला. कोरोना काळात घरातील लहान बालकांना अंगणवाडीत मिळालेल्या डाळी काही पालकांनी दुकानात विकल्या, तर काहींनी त्या पाहुण्यांना दिल्या. अंडी, केळी यांवर घरातील व्यक्तींना ताव मारला, असे अंगणवाडी सेविकेने सांगितले.

कुपोषण कमी करण्यासाठी समता फाउंडेशन व रोटरी क्लबचे मोठे सहकार्य लाभल्याचे तालुका महिला बालविकास प्रकल्प अधिकारी हरिभाऊ हाके, भारती साताळकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी योग्य नियोजन करून हा आकडा निम्म्यावर आणला.

आकडेवारी २०२१ ची आहे. सध्या हा आकडा घटला आहे. विविध पातळ्यांवर कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे. शिबिरे घेऊन बालकांना सुदृढ यादीत आणण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. पालकांनी सजग राहावे व यंत्रणेला सहकार्य करावे.

- डॉ. श्यामकांत शेटे, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT