नगर: नगर जिल्ह्यात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण धडकी भरवणार आहे. तब्बल बारा हजाराकडे हा आकडा चालला आहे. असे असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही मोठी ही आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.
जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्ण संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आज ५७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १००८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७८.०५ टक्के इतकी आहे.
काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६८२ इतकी झाली आहे.
बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २७, पाथर्डी ०३, नगर ग्रा. १०, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा २५३ संगमनेर ३८, राहाता २७, पाथर्डी ४८,, नगर ग्रा. ३४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट २७, नेवासा २२, श्रीगोंदा २१, पारनेर २७, अकोले ०५, राहुरी ११, शेवगाव ११, कोपरगाव ०५, जामखेड १२, कर्जत २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: १००८१, उपचार सुरू असलेले रूग्ण:२६८२, मृत्यू :१५३, एकूण रूग्ण संख्या:१२९१६
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.