The number of tankers in the house of 100
The number of tankers in the house of 100 
अहमदनगर

टॅंकरचा आकडा 100च्या घरात !

सकाळ वृत्तसेवा

 नगर ः गाव शिवारात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टंचाईचे सावटही जाणवू लागले. जिल्ह्यातील 88 गावे व 350 वाड्या-वस्त्यांवरील एक लाख 56 हजार 586 नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या 93 टॅंकरची धावाधाव सुरू आहे. 

गेल्या वर्षी पावसाने कहर केला. टॅंकरच्या आकड्याने अठरा वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक करीत उच्चांकी आकडा गाठला होता. मागील वर्षी जिल्ह्यातील 572 गावे व तीन हजार 200 वाड्या-वस्त्यांवरील 13 लाख 49 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 827 टॅंकर धावत होते. यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चांगली राहिल्याने टॅंकरची मागणी उशिरा आली. यंदा एप्रिलच्या सुरवातीला जिल्ह्यातील पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. सुरवातीला टॅंकरमंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची व्यवस्था लक्षात घेऊन सरकारने ते प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहेत. आजअखेर जिल्ह्यातील दहा तालुक्‍यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात शासकीय 25, तसेच खासगी 68 टॅंकर सुरू आहेत. 

तालुकानिहाय टॅंकर 
संगमनेर-09 
अकोले-02 
नेवासे-01 
नगर-16 
पारनेर-18 
पाथर्डी-05 
शेवगाव-04 
कर्जत-13 
जामखेड-19 
श्रीगोंदे-06 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT