Mamata Banerjee demands arrest of Gyanesh Kumar
esakal
कोलकाता : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात झालेल्या निवडणुका आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) ज्ञानेश कुमार यांना अटक करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, त्यांच्या देखरेखीखाली ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.