Objections to the draft electoral roll in Parner 
अहिल्यानगर

पारनेरमध्ये प्रारूप मतदारयादीवर हरकतींचा पाऊस, प्रशासन हँग

मार्तंड बुचुडे

पारनेर ः नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीवर मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 659 हरकती आल्या आहेत. हरकती दाखल करण्याचा सोमवार (ता. 22) हा शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच त्यावर हरकतींचा पाऊस पडला. अनेकांनी बोगस कागदपत्रे सादर करून मतदार यादीत शहराबाहेरील मित्र, नातेवाइकांचा समावेश केला आहे. दाखल झालेल्या या हरकतींवर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. 
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याची प्राथमिक तयारी म्हणजे, मतदारांची प्रारूप यादी. ही यादी 15 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाली. त्यावर 22 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत होती. त्यानुसार कालपर्यंत (सोमवार) उच्चांकी 659 हरकती आल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणेला त्याची शहानिशा करून अंतिम यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. हे अतिशय जिकिरीचे काम आहे. कारण, अंतिम यादी एक मार्चला जाहीर करावी लागणार आहे, म्हणजेच अवघ्या सात दिवसांत हरकतींचा निपटारा प्रशासनाला करावा लागणार आहे. 

संबंधित प्रभागात जाऊन मतदार तेथे राहतो का, याची खात्री करावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित मतदार वा त्या प्रभागातील इच्छुक उमेदवारास, मतदार तेथेच राहत असल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरणार आहे. मात्र, त्याशिवाय हरकतींचा निपटारा करणे प्रशासनास कठीण आहे.

एखाद्या प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात गेली असतील, तर त्याचीही खात्री करावी लागणार आहे. मतदान केंद्रनिहाय यादी आठ मार्चला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे एक मार्चनंतर कोणत्याही क्षणी नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

12 हजार 66 मतदार 
नगरपंचायतीच्या प्रारूप यादीनुसार 12 हजार 66 मतदारांची नोंद झाली आहे. आता त्यावर हरकतींचा पाऊस पडला आहे. त्यामुळे अंतिम यादीत नगरपंचायतीचे भविष्य कोणाच्या हाती द्यायचे, हे ठरविण्यासाठी किती मतदार राहतात, हे एक मार्चलाच निश्‍चित होणार आहे. हरकतींमुळे सुमारे दोन हजारांवर नावे कमी होतील, असा अंदाज आहे. 

हरकतींवर शहानिशा करण्यासाठी थेट प्रभागात जाणार आहोत. नंतर त्याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी तथा नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे सादर केला जाणार आहे. तेच अंतिम यादीबाबत निर्णय घेतील. 
- डॉ. सुनीता कुमावत, मुख्याधिकारी, पारनेर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT