amc nagar
amc nagar 
अहमदनगर

अहमदनगर महापालिकेत एक अधिकारी तीन कर्मचारी कोरोना बाधित 

अमित आवारी

नगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. नगर शहर कोरोना बाधित रुग्णांचे केंद्र ठरू लागले आहे. गेल्या 15 दिवसांपासून नगर शहरातील कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचा आलेख चढता राहिला आहे. शहरातील व्यापाऱ्यांबरोबरच आता महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील तीन व्यापाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही चिंतेत आहे. 

शहरातील महापालिका प्रशासनाकडून कोरोना विषाणूंचा प्रसार करण्यासाठी राबविण्यात येत असलेली यंत्रणा कमी पडत आहे. महापालिकेत ठराविक अधिकारी व कर्मचारीच कार्यालयातील स्वतःचे दैनंदिन काम करून कोरोना विरोधातील मोहिमेत सक्रियपणे काम करत आहेत. उर्वरित कर्मचारी महापालिकेतील दैनंदिन कामही वेळेवर करत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ठराविक कर्मचाऱ्यांना खूप काम व बाकीच्यांना आराम अशी स्थिती असल्याची चर्चा आहे.

यातच महापालिकेत गुरुवारी (ता. 9) दोन कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे महापालिकेत दोन महिन्यांनंतर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना होणारी कोरोनाची लागण ही सॅनिटायझर फवारणी थांबवू शकली नसल्याचे समोर येत आहे. आज सकाळीच एक वरिष्ठ अधिकारी व एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांत चिंता व घबराटीचे वातावरण आहे. 

आणखी एक व्यापाऱ्याचा मृत्यू 
कोरोनामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एकाचा एकुलता एक असलेला 24 वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्याच्यावर कोरोना संदर्भातील उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT