Dilip Walse Patil esakal
अहिल्यानगर

Dilip Walse Patil : अधिकाऱ्यांनी दर्जेदार कामे करून घ्यावीत; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्पष्ट आदेश

पहिल्यांदाच विकास कामासाठी मोठा निधी तालुक्यात आला

चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. पहिल्यांदाच विकास कामासाठी मोठा निधी तालुक्यात आला आहे. ही विकास कामे दर्जेदार व्हावी. यासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून दर्जेदार कामे करून घ्यावीत . वीज वितरण कंपनीची कामे ठेकेदारांनी पूर्ण केली नाहीत याबाबत आढावा घेऊन त्या ठेकेदारांना काळया यादीत टाका असे स्पष्ट आदेश आज (ता १७ )राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

घोडेगाव (ता आंबेगाव ) येथील पंचायत समितीचया हुतात्मा बाबु गेनु सभागृहात आंबेगाव तालुक्यातील विविध विभागांची प्रशासकिय आढावा बैठक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, तहसिलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे, माजी सभापती कैलासबुवा काळे, संजय गवारी, नंदकुमार सोनावले, डॉ.ताराचंद कराळे, जे.के.थोरात, निलेश थोरात, डॉ.प्रमोद बाणखेले, इत्यादी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील पंचायत समितीच्या सर्व विभाग , सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे, आदिवासी विकास प्रकल्प, वीज वितरण कंपनी, वन विभाग , कृषी विभाग, परिवहन विभाग यासह अनेक खात्यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत वीज वितरण कंपनीच्या कामावर वळसे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक कामे मंजूर असूनही ठेकेदारांनी ती कामे केली नाहीत. अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले . यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

अशा ठेकेदारांना काळया यादीत टाका. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत असे परखड आदेश राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विद्युत वितरण विभागाच्या अधिका-याना दिले. विद्युत वितरण विभागात अनेक गरजेची कामे मंजुर आहेत. मात्र हि वेळेत होत नसल्याने वळसे पाटील यांनी ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे आकडे मोठे मात्र जागेवर कामेच नाहीत.अनेक गावांमधून याबाबत तक्रारीत येत आहेत. आंबेगाव तालुक्यात 118 योजना मंजुर आहेत पैकी फक्त 18 पुर्ण झाल्या आहेत. या योजना बनविताना व्यवस्थीत अभ्यास न करता बनविली गेल्या. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. यासाठी जिल्हास्तराव बैठक घेवू असे वळसे पाटील यांनी सांगितलीे.

आंबेगाव तालुक्यात कोटयावधी रूपयांची कामे सुरू आहेत. हि कामे लवकरात लवकर व दर्जेेदार करण्याकडे अधिका-यांनी लक्ष दिले पाहिजे. हा मंजुर निधी खर्च केला पाहिजे व झालेली कामे लोकउपयोगात येतील हे पाहिले पाहिजे. जिल्हयात अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ड्रोण फिरत असल्याच्या बातम्या येत आहेत. पोलिस यावर लक्ष ठेवून आहेत, हे ड्रोन पाडण्यासाठी मशिनची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. हे मशिन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.लोकांनी घाबरून जावू नये पोलिस प्रशासन दक्ष आहे. असे वळसे पाटील यांनी सांगितले.

एक रूपयात विमा काढून मिळतो मात्र आंबेगाव तालुक्यात फक्त ९ हजार शेतक-यानी विमा काढला आहे. हि संख्या अतिशय कमी असून कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतक-यांचा पिक विमा काढून घ्यावा. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, पीएम विकास अशा विविध योजना राबवण्यासाठी अधिका-यांनी लक्ष घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

C. P. Radhakrishnan VP Candidate : उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का? यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

Latest Marathi News Live Updates : पुढचे ७ दिवस धोक्याचे; कोकणसह मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट

नासा-इस्रोच्या NISAR ने गाठला मोठा टप्पा; उपग्रहाची छत्री उघडली, पृथ्वीला स्कॅन करून देणार 'या' 3 समस्यांवर माहिती

Nanded Heavy Rain : मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस, एका रात्रीत १८ फूट पाणी वाढलं; ६ गावं पाण्याखाली

Gold Reserves: अनेक जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे; राज्याचं भविष्य बदलणार, किती आहे सोनं?

SCROLL FOR NEXT