One and a half hundred coronas hit the trip 
अहिल्यानगर

भाऊचा बड्डे नगरकरांना नडला, सहलीतून दीडशेजणांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नगर शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. मागील वर्षी परदेशी व्यक्तिंमुळे कोरोना आला होता.

नगर शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या बड्डेमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. त्याच्या वाढदिवसामुळे तब्बल दीडशेजणांपेक्षा जास्त लोक बाधित झाले आहेत.

आपल्या एकसष्टीनिमित्त त्याने शहर व जिल्ह्यातील आपेष्टांची सहल उत्तर भारतात नेली होती. या ट्रीपने घात केला आहे. वैष्णवदेवी, जम्मू, काश्मीर, अमृतसर भागात देवदर्शन करवून आणले. नेमके हे लोक कोठे बाधित झाले, हे माहिती नाही. परंतु त्यामुळे समूह संसर्ग झाला आहे.

तब्बल पावणे दोनशेजणांची ही सहल होती. रेल्वेने ही सहल काढण्यात आली. यात सहलीत शेवगाव, नगर शहर, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यातील लोक सहभागी झाले होते. 

सहलीत असताना काहीजणांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे ते माघारी आले. त्याची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकामुळे मोठ्या प्रमाणात कोरोना जिल्ह्यात घुसला आहे.

मागील आठवड्यात एक अंत्ययात्रा निघाली होती. त्या व्यक्तीच्या घरातील लोक बाधित झाले आहेत. त्यांच्यामुळे इतरांनाही बाधा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी धास्ती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'नंदा देवी' मोठ्या दिमाखात भारतात दाखल! तुमच्या घरातला गॅसचा प्रश्न सुटला...

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

Gold Investment: युद्ध सुरू असतानाही सोन्याचे भाव का पडले? शेअर बाजार कोसळला तरी सोनं स्वस्त का? पुढे काय होणार? तज्ज्ञांचे मत

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमधील मुळा नदीच्या पात्रात आढळला महिलेचा मृतदेह

Navi Mumbai: महाराष्ट्रात मोठी ड्रग्ज तस्करी, धागेदोरे पाकिस्तानातून पंजाबमार्गे, ४० आरोपींना अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT