One dies after drowning in lake
One dies after drowning in lake 
अहमदनगर

शेततळ्यात पोहायला गेला आणि बुडाला

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः तालुक्‍यातील वडझरी खुर्द येथील पोहण्यासाठी शेततळ्यात गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वैभव दत्तू गोरडे (वय 20) असे मृताचे नाव आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

वडझरीच्या शिवारातील कवठे कमळेश्वर रस्त्यानजीक संजय गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतातील शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी प्रदीप त्याच्या दोन मित्रांसह गेला होता. पाण्यात दोरी फेकून त्यांनी बुडणाऱ्या प्रदीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोरी तुटल्याने त्याला पाण्याबाहेर येता आले नाही.

या घटनेची माहिती पोलिस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक युवकांच्या मदतीने शेततळ्यातील प्रदीपचा मृतदेह पाण्याबाहेर काढून संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिस पाटील सुपेकर यांच्या खबरीवरून संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT