One hundred and thirty crores given by the devotee for Shirdi
One hundred and thirty crores given by the devotee for Shirdi 
अहमदनगर

बघा, साईभक्ताची श्रद्धा, समजलं शिर्डीत कोरोनाय तर लगेच दिले सव्वा कोटी

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः तातडीच्या उपचारासाठी साईसंस्थानच्या कोविड उपचार केंद्रातून रुग्णांना महानगरात पाठवावे लागते. तेथे बेड मिळत नाहीत. बेड मिळाले, तर आगाऊ रक्कम भरणे अशक्‍य होते. त्यातून मार्ग निघाला, तर वेळेवर उपचाराची खात्री नसते.

अशा एक ना अनेक विदारक अनुभवांचा सामना करावा लागू नये, यासाठी साईसंस्थानाने ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा असलेले रुग्णालय सुरू करण्याचे ठरविले. मात्र, त्यातील अडचणी काही दूर होत नाहीत. तत्पूर्वीच ठिकठिकाणच्या साईभक्तांनी नियोजित रुग्णालयासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भाविकांची साईबाबा आणि शिर्डीवरील भक्ती त्यातून प्रकट होते. 

साईमंदिराच्या एका पुजाऱ्याला हैदराबाद येथील भाविकाने "शिर्डीत काय चालले आहे' अशी विचारणा केली. त्यावर कोविडची साथ सुरू असून, संस्थानाने दोन कोविड सेंटर सुरू केल्याचे पूजाऱ्याने सांगितले. भाविकाने टाटा ऍटोकॉम कंपनीतर्फे तब्बल एक कोटी 30 लाख रुपये किंमतीची पीपीई कीट, मास्क, फेसशिल्ड, ग्लोज वगैरे साहित्य पाठवून दिले. 

साईसंस्थानने कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी 50 कोटी रुपये दिले. मागील अध्यक्ष सुरेश हावरे यांनी तब्बल दीडशे कोटी रुपये बाहेर दिले. आता तातडीच्या उपचारासाठी कोविड रुग्णालय सुरू करण्याची वेळ आहे. त्यासाठी मोठा खर्च आहे. त्यास कशी मान्यता घ्यायची, हा प्रश्न समोर आला. त्याच वेळी "ऍटलस' कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्चाची ऑक्‍सिजन प्रणाली देण्याची पूर्वतयारी केली. 

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सरकारी निधीतून 15 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. एका भाविकाने औषधखरेदीसाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. 

साईबाबा आणि शिर्डीसाठी भाविकांचा मदतीचा हात सदैव पुढे असतो. मात्र, रुग्णालय सुरू झाले, तरी डॉक्‍टर कुठून आणायचे, हा प्रश्न कायम आहे. सरकारला कोविड उपचारासाठी साईसंस्थानने 50 कोटी रुपये देऊनही येथील कोविड सेंटरला सरकारी यंत्रणेकडून पुरेशी औषधे मिळाली नाहीत. आणखी 8 ते 15 दिवस तरी रुग्णालय सुरू होण्याची शक्‍यता दिसत नाही. 

गेल्या तिन महिन्यात साईसंस्थानच्या दोन्ही रूग्णालयात विवीध आजारांच्या उपचारासाठी आलेल्या रूग्णांत दोनशेहून अधिक रूग्ण कोरोना बाधित निघाले. पंचवीस ते तीस हून अधिक रूग्णांना तातडीच्या उपचारासाठी बाहेर पाठवावे लागले. आता साईसंस्थान स्वखर्चाने पन्नास खाटांचे तसेच दहा व्हेटींलेटर असलेले रूग्णालय सूरू करण्याच्या तयारीला लागले. मात्र त्यासाठी डॉक्‍टर उपलब्ध करून देण्यास सरकारी यंत्रणेने असमर्थता दाखवीली. आता या समस्येचे निराकारण कसे करायचे यावर विचारविनीमय सुरू आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT