Corona Vaccination sakal media
अहिल्यानगर

अहमदनगर जिल्ह्यात एक लाख डोस शिल्लक

हसन मुश्रीफ; लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

अकोले : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. असे असले, तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. आजही जिल्ह्यात लसीचे एक लाख १७ हजार डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण काम करावे, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

अकोले विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) झाले‌. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, संगमनेरचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सतीश थिटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देशाने १०० कोटी लसीकरणाच्या टप्पा ओलांडला आहे. नगर जिल्ह्यात ३२ लाख ५६ हजार डोस देण्यात आले आहेत. दुसरा डोस आठ लाख ४४ हजार व्यक्तींनी घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, असे ते म्हणाले. शासनाच्या मिशन कवच-कुंडले व युवा स्वास्थ्य मोहिमेविषयी त्यांनी माहिती दिली. तसेच, अकोले येथे उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, अशी सूचनाही केली. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली.

भाजपचे सुडाचे राजकारण

बैठकीत नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधकांचासमाचार घेतला. ते म्हणाले, की विरोधकांकडे काहीच मुद्दे राहिले नाहीत. राज्यात महाविकास आघाडी अभेद्य राहणार हे लक्षात आल्याने भाजप वेगवेगळ्या चौकशांचा ससेमिरा लावून सुडाचे राजकारण करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पाऊस उघडीप देणार; पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज आला,पुण्याला मात्र ऑरेंज अलर्ट

विशेष : अर्थशास्त्र : भविष्यातील रोजगाराच्या अमर्याद संधी

मोठी बातमी! सोलापूर-पुणे हायवेवरील ६० मीटर अंतरातील ढाबे, हॉटेल ६ महिन्यांत हटणार; ‘एनएचएआय’कडून नोटिसा, ६ महिन्यांत ४२६ जणांचा अपघाती मृत्यू, वाचा...

Ghatkopar landslide : घाटकोपरमध्ये दरड कोसळून दोघांचा मृत्यू; ५-६ घरांवर दरड, अनेकजण अडकल्याची भीती

Dahi-Paneer Kebab: पोटही भरेल, चवही खुलून येईल! कमी तुपात बनवा कुरकुरीत दही-पनीर कबाब; नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT