One lakh tonnes of sugarcane is crushed daily in Nashik division 
अहिल्यानगर

नाशिक विभागात रोज होते एक लाख टन उसाचे गाळप

सूर्यकांत नेटके

नगर ः नाशिक विभागातील 32पैकी 25 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यात नगरमधील 21, तर नाशिकमधील चार कारखान्यांचा समावेश आहे. त्यातून रोज साधारण एक लाख 10 हजार टन गाळप होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 लाख, तर विभागात 31 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 25 लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. 

नगर जिल्ह्यात 23, तर नाशिक जिल्ह्यात नऊ साखर कारखाने आहेत. त्यांतील 13 कारखाने खासगी आहेत. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने नगरमध्ये 21 कारखाने सुरू आहेत. दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अजून सुरू झाले नाहीत. जिल्ह्यात रोज 90 हजार, तर विभागात एक लाख 10 हजार टन उसाचे गाळप होते. तब्बल 18 कारखान्यांत क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप सुरू आहे. 

नगर जिल्ह्यात 29 लाख टन ऊसगाळप झाले असून, त्यात 25 लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरउत्पादन झाले आहे. विभागात 31 लाख टनांपेक्षा अधिक ऊसगाळप झाले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक गाळप मुळा, भाऊसाहेब थोरात, वृद्धेश्वर, गंगामाई, अंबालिका कारखान्यांचे आहे. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात सरासरी 10.20 टक्के साखरउतारा निघाला होता. यंदा तो त्या तुलनेत कमीच आहे. आतापर्यंत सरासरी 8.01 साखरउतारा निघाला आहे. विभागाचा सरासरी साखरउतारा 8 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम अहवालानुसार साखरउतारा सरासरी 10.42 होता. 
 

यंदा उसाचे दुप्पट गाळप होणार 
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी 56 लाख 66 हजार टन उसाचे गाळप केले होते. त्या तुलनेत यंदा दुप्पट गाळप होण्याचा अंदाज आहे. विभागात एक कोटी टन ऊस उपलब्ध आहे. अन्य भागातून 20 लाख टन ऊस विभागात येण्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून वर्तविण्यात आला. साधारणपणे सहा महिने गाळप चालण्याचा अंदाज आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT